सोना मूळचीच हुशार. तिनं आपल्या बाबांना कशी मदत केली, हे तुम्ही कदाचित वाचलं असेल. या गोष्टीत, आई जे काम करते आहे, तेच तिलाही करायचं आहे.
एका छोट्या मुंगीचा प्रत्येक दिवस लहान-मोठ्या संकटांनी भरलेला असतो. इतकी इवलीशी असूनही ती प्रत्येक संकटाला कशी धीराने तोंड देते ते तुम्हाला माहीत आहे का? चला, या मुंगीताई सोबत एका गमतीशीर सफरीवर जाऊया.
प्रेम आणि त्याच्या मित्रांना छोट्याशा काडेपेटीने चांगलंच काम लावून दिलं. तुम्हीपण ही कामगिरी घरच्या घरी पार पाडू शकता. तुमचा वेळ मजेत जाणार ही हमी आम्ही नक्की देतो.
चिनूला आपल्या वडलांना मदत करायला आवडते. कधी कधी त्याला त्याबद्दल बक्षीसही मिळते!
पक्षी आणि प्राण्यांनी शेतात घुसू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी शेतात बुजगावणी उभारतात. पण छोट्या गौरीला मात्र काही वेगळंच वाटतं!
अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिश्यावाली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात.
By navigating this website, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation and analyze site usage.